dr.satish best web design developer for mac

सांबरे ग्रामपंचायत :

सांब म्हणजे शंकर या नावावरून गावचे नाव सांबरे असे पडले आहे. घटप्रभा व ताम्रपर्णी या दोन नद्यांच्यामध्ये सांबरे गाव वसलेले आहे. गावचे पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण क्षेत्रफळ 1,22,458 हेक्टर इतके आहे. सुख-समाधानाने बहरलेलं, माणसाची माणुसकी जपणारं, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर वसलेलं गडहिंग्लज तालुक्यापासून 27 किलोमीटर तर कोल्हापूर जिल्ह्यातील 89 किलोमीटर अंतरावर असलेल सुंदर व सुसज्ज असे आमचं गाव. गावाच्या शेजारी कानडेवाडी, हडलगे, कुमरी, डोनेवाडी, मलतवाडी ही गावे आहेत. गावामध्ये नदी, बोअर असल्यामुळे पाणी नळ कनेक्शन व्दारे गावामध्ये पुरविण्यात आले आहे. गावात स्वच्छता राखण्यासाठी कचरा कुंडी बसविलेल्या आहेत. गावातील लोकानी निर्मल ग्रामसाठी चांगले सहकार्य केले आहे. गावातील जेष्ठ नागरीक, पदाधीकारी, पंचायत समीतीचे अधिकारी तसेच ग्रामसेवक यानी निर्मलग्रामसाठी पुढाकार घेतला आहे. गावामध्ये अंतर्गत रस्ते पक्के आहेत. तसेच अंतर्गत गटारींची बांधकाम चंगल्या पध्द्तीने केलेली आहे. गावात रात्रीचा वेळी प्रकाशासाठी स्ट्रेट लाईट बसविण्यात आले आहेत.


ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

आमच्या गावात ग्रामपंचायतीची स्थापना 1956 साली झाली. ग्रामपंचायतीची निवडणूक ही दर पाच वर्षानी होते. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर नऊ सदस्यांची गावातील नागरिकांच्या एकमताने नेमणूक केली आहे. यांच्यामार्फत गावाचा कारभार, विकास, गावातील लोकांच्या समस्यांची सोडवणूक, गावात शासनातर्फे आलेल्या विवध योजना लोकांपर्यंत पोहोचविणे आदी ग्रामविकासाची कार्ये केली जातात.

सरपंच
श्रीमती. सरस्वती कृष्णा नाईक

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
सौ. वैजयंता नेताजी पाटील

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. एस. बी. माने

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

FOLLOW US

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Sambare Grampanchayat
A/p - Sambare Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416504

CONTACTS
Phone :

Office :02327-270124